काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर राफेल करारावरुन हल्लाबोल केला आहे. या करारामुळे फ्रान्स सरकार अडचणीत आले असल्याचे ही राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.
राफेल करारासाठी 2007 पासून प्रयत्न केले जात होते. परंतु मोंदीच्या गेल्या वर्षातील फ्रान्स दौऱ्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यानंतर भारत फ्रान्सकडून 36 फायटर जेट्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली गेली. मात्र या प्रकरणी फ्रान्स सरकार अडचणीत येत आहे. भारत फ्रान्स राफेल कराराच्या बाबतीत फ्रान्समधील एका एनजीओने या मु्द्द्यावरुन तिथल्या लोक अभियोजक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. तर या प्रकरणी कसून चौकशी करुन त्याबद्दलची माहिती या एनजीओने मागितली आहे.
राहुल गांधी यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्यावेळी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मोदींनी माझ्याशी व्यासपीठावर येऊन 15 मिनिटे राफेल करारावर चर्चा करावी असे आव्हान मोदींना दिले आहे.