Petrol-Diesel Price Hike: वाढत्या महागाईवर राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi (Photo Credits: ANI)

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने महागाईवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. महागाईबाबत त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला टोला (Central Govt) लगावला आहे. त्यांनी शनिवारी ट्विट करताना लिहिले की, 'राजा करे महल की तैयारी, प्रजा बेचारी महंगाई की मारी'  याआधी शनिवारी राहुल (Rahul Gandhi) यांनी महागाई आणखी वाढेल, असा इशारा दिला. यासोबतच देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली होती. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होण्यापूर्वीच किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्ग पिचला गेला आहे.

यापूर्वी पाच राज्यांमध्ये पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतरही राहुल यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी एफडी, पीपीएफ, ईपीएफ आणि महागाईशी संबंधित आकडे ट्विट केले आणि जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची नाही का, असा सवाल केला. (हे देखील वाचा: Delhi: (डिझेल-पेट्रोल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत केली निदर्शने)

Tweet

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ 

शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याचा बोजा तेल कंपन्या ग्राहकांवर टाकत असून, त्यामुळे गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी जारी केलेल्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोलच्या दरात 84 पैशांनी तर डिझेलच्या दरात 85 पैशांनी वाढ झाली आहे. अशाप्रकारे शनिवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 112.51 रुपयांवरून 113.35 रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे डिझेलचा दर 96.70 रुपयांवरून 87.55 रुपये प्रतिलिटर झाला आहे.