हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळदार पावसामुळे सर्वत्र पुरसदृक्ष परिस्थिती निर्माण झाली आहे. यात प्रसिद्ध पंजाबी गायक मनमीत सिंह वाहत्या पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त समोर आले होते. पोलिसांच्या अथक शोधकार्यानंतर गायक मनमीतसिंग यांचा मृतदेह कांग्रा जिल्ह्यातील कारेरी तलाव भागात सापडला आहे. मंगळवारी रात्री पूर कमी झाल्यानंतर बचावकार्य चालू असताना त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. सुफी गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संगीत बंधू तसेच सैन बंधूंपैकी एक गायक मनमीत सिंग होते. काही दिवसांपूर्वी काही मित्रांसोबत धर्मशाळेत आले होते. सोमवारी ते धर्मशाला येथून कारेरीला गेले होते. मुसळधार पावसात मनमीत सिंह पाय घसरून करारी तलावात पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह आज अमृतसरला पाठविला जात आहे.
सोमवारपासून मनमीत सिंग बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असल्याचे कांग्राचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक विमुक्त रंजन यांनी सांगितले. त्यांप्रमाणे त्यांचा शोध सर्वत्र सुरू होता. सोमवारी हिमाचल प्रदेशात झालेल्या भीषण पुरामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ जण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या पुरामुळे मोठी हानी झाली आहे. राज्य महसूल विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात 142 रस्ते वाहतूकीसाठी बंद झाले आहेत.
सोमवारी झालेल्या फ्लॅश पूरानंतर मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी राज्याचे हवाई पाहणी केली आहे. पाहणी दरम्यान या पूरात सर्वाधिक नुकसान झालेल्यांना राज्य सरकारकडून पूर्ण मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच पुरात उद्धवस्त झालेली गावे पुन्हा नवीन उभारली जाणार असल्याचे सांगितले. सोमवारी झालेल्या पावसाचा बोहा शहरातील एका गावाला जोरदार तडाखा बसला आहे. या भूस्खलनात एका महिलेला आपला जीव गमावला लागला. हे ऐकून मला वाईट वाटले. अनेक लोक अजूनही अडकले आहेत. आम्ही त्यांचा बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. अशी प्रतिक्रीया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.