देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जी सेवन (G-7 Summit) परिषदेत सहभागी होणार नाही. ही परिषद इंग्लंडमध्ये पार पडणार आहे. या परिषदेसाठी इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले होते. चीन सोबत अमरिका आणि पश्चमि देशांमध्ये वाढत असलेल्या ताण-तणावांना डोळ्यासमोर ठेऊन G-7 Summit च्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या परिषदेत अमेरिका, इंग्लंड यांच्याकडून लोकशाही देशांना एका व्यासपीठावर आणण्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रलियाच्या प्रमुखांना बोलविण्यात आलेले आहे. दरम्यान, या परिषदेत पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धीतीने या परिषदेत सहभाग नोंदवणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, इंग्लंडचे पंतप्रधान जॉनसन यांच्याकडून या बैठकीत विशेष पाहुणे म्हणून दिलेल्या निमंत्रणाचा आम्ही आदर करतो. परंतू, देशातील कोरोना स्थिती पाहून पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्तिगत रित्या या परिषदेत सहभागी होणार नाहीत. (हेही वाचा, Sonia Gandhi In CWC: काँग्रेस पक्षात मोठ्या सुधारणांची गरज- सोनिया गांधी)
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर G-7 Summit शिखर बैठकीच्या तयारीसाठी संबंधीत परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी लंडनाला गेले होते. तिथे भारतीय अधिकाऱ्यांपैकी काही सदस्य करोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले होते.
दरम्यान, 4 मे रोजी उभय देशांच्या नेत्यांमध्ये एक व्हर्च्युअल बैठक पार पडली होती. यात काही महत्त्वपूर्ण बैठकींवर चर्चा झाली होती. या बैठकीत एक रोडमॅप 2030 लॉन्च करण्यात आले होते. जे पुढच्या 10 वर्षांमध्ये भारत-ब्रिटेनसोबत सहकार्य आणि व्यापार आदींना भक्कमता देण्याबाबत विचारविनिमय झाली.