Narendra Modi | | (Photo Credit : ANI)

Hanuman janmotsav 2022: आज म्हणजेचं 16 एप्रिल रोजी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव (Hanuman Janmotsav) साजरा केला जाणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शनिवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या 108 फूट मूर्तीचे अनावरण करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) यासंदर्भात माहिती दिली आहे.

हनुमानजी चार धाम प्रकल्प -

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हनुमानजी चार धाम प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना स्थापित करण्यात येणाऱ्या चार मूर्तींपैकी ही दुसरी मूर्ती आहे. देशाच्या पश्चिमेकडील मोरबी येथील परमपूज्य बापू केशवानंद यांच्या आश्रमात ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे, असे पीएमओने म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाने पुढे सांगितले की, 'हनुमानजी चार धाम प्रकल्प मालिकेतील पहिली मूर्ती 2010 मध्ये उत्तरेकडील हिमाचल प्रदेशातील शिमला येथे स्थापित करण्यात आली होती, तर दक्षिणेकडील रामेश्वरममध्ये तिसऱ्या पुतळ्याचे काम सुरू झाले आहे. (हेही वाचा - Loudspeaker In Uttar Pradesh: महाराष्ट्रातून सुरु झालेला अजानचा वाद आता उत्तर प्रदेशात, अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण)

या वर्षी हनुमान जन्मोत्सवाचा शुभ दिवस शनिवार, 16 एप्रिल रोजी येत आहे. शनिवार असल्याने या हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व खूप वाढले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जन्मोत्सव वर्षातून दोनदा येतो. कारण भगवान हनुमानाच्या जन्माबाबत थोडेफार मतभेद आहेत. रामायणानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला पवनच्या मुलाचा जन्म झाला असे मानले जाते. दुसरीकडे, असे मानले जाते की हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला होता.