धक्कादायक! तीन मुलांसह गर्भवती महिलेची गळा चिरून हत्या; पोटातील बाळ वाचू नये म्हणून खुपसला चाकू
हत्येनंतर जमा झालेले गावकरी (संग्रहित-संपादित प्रतिमा)

बिहारच्या अररिया (Araria) वस्ती पंचायतच्या माधोपाडा गावात गुरुवारी रात्री एकाच कुटुंबातील 4 लोकांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 4 एकर जमिनीच्या वादातून गरोदर महिला आणि तिच्या लहान तीन मुलांची निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली. या महिलेच्या पोटातील बाळ वाचू नये म्हणून तिच्या पोटाच चाकू खुपसून पोटातील मुलाचीही हत्या करण्यात आली आहे. सध्या या घटनेमुळे राज्यातील वातावरण सुन्न आहे, पोलिसांनी याबाबत काही लोकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती आलम गुरुवारी रात्री जवळच शौचासाठी बाहेर गेला होता. त्याचवेळी काही लोक त्याच्या घरात घुसले आणि त्याची पत्नी तबस्सुम (30), मुलगा समीर (4), पुत्री आलिया (6) आणि पुत्र शब्बीर (8) यांची गळा चिरून हत्या केली. यादरम्यान झालेला आरडा ओरडा आणि किंकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. मात्र तोपर्यंत हत्यारे निघून गेले होते. यामध्ये तबस्सुम 8 महिन्यांची गर्भवती होती, तिच्या पोटातील मुल जिवंत राहू नये म्हणून तिच्या पोटात हत्यार खुपसून बाळाचा जीव घेतला गेला. (हेही वाचा: गर्लफ्रेण्डच्या नादात संसार बर्बाद; बापाने चिरला 3 वर्षांच्या मुलीचा गळा, पत्नालाही मारले ठार)

आलमने पोलिसांना हे कृत्य जमिनीच्या वादातून घडल्याचे सांगितले आहे. मात्र पोलिसांना याबाबत शंका आहे, त्यांना आलमची भूमिका संशयास्पद वाटत आहे. दरम्यान, एसपी धुरत सयाली प्रकरणाचे चौकशी करत आहेत. सध्या सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे गावात संतापाची लाट पसरली असून, पोलिसांनी लवकर काही हालचाल केली नाही तर आपणच हत्यारांना मारून टाकू अशी भूमिका काही गावकऱ्यांनी घेतली आहे.