Representative Image Created Using AI

Prayagraj Traffic Update: महाकुंभमेळ्यादरम्यान भाविकांची गर्दी होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रयागराजला गर्दी पाहायला मिळत आहे. अमृतस्नानानंतर गर्दी कमी होईल असे वाटत होते. मात्र, नेमकं याच्या उलट दिसत असून संपूर्ण महाकुंभमेळ्यादरम्यान वाहनांची गर्दी पूर्वीपेक्षा आता लक्षणीय वाढली आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीची स्थिती बिकट झाली आहे. रविवारी जबलपूर, कटनी, मैहर आणि रीवासह अनेक भागात २०० ते ३०० किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक भाविक तासनतास गर्दीत अडकल्याचे पाहायला मिळत आहे. संगमाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर १० ते १५ किलोमीटर लांब वाहतूक कोंडी होत असल्याने सर्वसामान्यांचा त्रास वाढला आहे. या भीषण वाहतूक कोंडीचा परिणाम लग्न समारंभावरही झाला आहे. पाहुणे येऊ शकत नसल्याने  अनेक कुटुंबांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. अनेक जण मेसेज पाठवून लग्न रद्द झाल्याची माहिती नातेवाईकांना देत आहेत. हेही वाचा: Kushinagar Mosque Demolition: योगी सरकारची मोठी कारवाई, उत्तर प्रदेशात आणखी एक बेकायदेशीर पद्धतीने बांधलेली मशिद पाडली, येथे पाहा व्हिडीओ

गर्दीमुळे अनेक लग्ने रद्द

 वाहतूक कोंडी, येथे पाहा पोस्ट 

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयागराज संगम रेल्वे स्थानक १४ फेब्रुवारीपर्यंत बंद केले आहे. प्रयागराज जंक्शनवरही गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की, मध्य प्रदेशातील मैहर सीमेवरील पोलिसांनी लोकांना प्रयागराजला जाण्यास मनाई केली आहे. कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करत असाल तर पुरेसे पाणी, अन्न आणि संयम बाळगा, कारण रहदारी किती वेळ असेल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.