महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार? काँग्रेसचा पाठिंबा मिळल्याचा शिवसेना पक्षाचा दावा
Sonia Gandhi, Uddhav Thackeray And Sharad Pawar (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोणाची सत्ता स्थापन होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजप- शिवसेना महायुतीने या निवडणुकीत अधिक जागा मिळवल्या असल्या तरी मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, भाजप विरोधी बाकावर बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यामुळे राज्यापालांकडून शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करुन दाखवावे, असे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, शिवसेना पक्षाकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास उरले होते. राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळल्याचा शिवसेनाने दावा केला आहे.

अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेना यांच्या मुख्यमंत्रीपदावरुन वाद निर्माण झाला असून राज्यात कधी सत्ता स्थापन होणार, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत होता. यातच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्णयाने अशा प्रश्नांना पूर्णविराम लावले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांकडून पक्षाच्या नेत्यावर दबाव टाकला जात होता. शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी दर्शवली जात होती. परंतु, राष्ट्रवादीचे मित्रपक्ष काँग्रेस सत्ते स्थापनेबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, आज अखेरेख काँग्रेस पक्षाकडून शिवसेनाला बाहेरून पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे लवकरच राज्यात नवे सरकार स्थापन होणार आहे. हे देखील वाचा-राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? सोनिया गांधी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष