पश्चिम बंगाल मध्ये आगामी विधानसभा निवडणूकांच्या (West Bengal Assembly Elections 2021) पार्श्वभूमीवर आता अनेक राजकीय घडामोडींना, नाट्यमय वळणांना जोर आला आहे. आज (13 मार्च) पश्चिम बंगाल मध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यशवंत सिंहा (Yashwant Sinha) यांनी तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress) मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. काही वेळापूर्वीच कोलकाता मध्ये टीएमसी भवन मध्ये त्यांचा थेट पक्षप्रवेश पार पडला. यावेळी प्रतिक्रिया त्यांनी 'लोकशाहीची ताकद ही त्यांच्या संस्था आहेत. आज साधारण सार्याच संस्था कमजोर होत आहेत. यामध्ये न्यायव्यवस्थेचादेखील समावेश आहे. आपल्या देशासाठी हे सर्वात मोठे संकट असल्याचं' यशवंत सिंहा म्हणाले आहेत. पश्चिम बंगाल: नंदीग्राम येथे काहींनी धक्का दिल्याने पायाला दुखापत झाल्याचे ममता बॅनर्जींचे म्हणणे पण हे नाटक असल्याची भाजपची टीका.
दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात यशवंत सिन्हा यांनी केंद्रीय अर्थमंत्री पद भूषवले आहे. सोबतच विदेश मंत्री पद देखील भूषवले आहे. नंतर 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले आणि यशवंत सिंहा यांनी भाजपा पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तृणमूल कॉंग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ANI Tweet
Former BJP leader Yashwant Sinha joins Trinamool Congress in Kolkata pic.twitter.com/21P5IDcMab
— ANI (@ANI) March 13, 2021
तृणमूल कॉंग्रेस पक्ष मोठ्या बहुमताने सत्तेमध्ये पुन्हा येईल असा विश्वास देखील आज यशवंत सिंहा यांनी बोलून दाखवला आहे. यावेळी बोलताना त्यांनी बंगाल मधून देशात एक संदेश गेला पाहिजे, मोदी, शाह दिल्लीमधून जे चालवत आहेत त्याला आता देश मूळीच सहन करणार नाही. असे देखील म्हणाले आहेत.