ममता बॅनर्जी (फोटो सौजन्य- ANI)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांनी आज नंदीग्राम येथून आगामी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर तेथील काही मंदिरात पूजा सुद्धा केली. यादरम्यान, एका मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर बाहेर निघताना ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. यामागे बॅनर्जी यांनी हे मुद्दामुन कोणीतरी केल्याचा आरोप केला आहे. बॅनर्जी यांनी असे म्हटले की, त्या जेव्हा मंदिरातून बाहेर येत होत्या त्यावेळी त्यांच्या गाडीजवळ चार-पाच तरुण येत त्यांना धक्का दिला. त्याच कारणामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. परंतु यावरुन आता विरोधकांनी ममता बॅनर्जी पायाला दुखापत झाल्याचे नाटक झाल्याची टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी मीडिया समोर असे सुद्धा म्हटले की, त्यांचा पाय खुप दुखत असून सुजला सुद्धा आहे. हा प्रकार घडला त्यावेळी एक ही पोलीस किंवा एसपी तेथे उपस्थितीत नव्हता. अशातच त्यांनी आता हा सुद्धा प्रश्न उपस्थितीत केला आहे की, मला जर झेड प्लस सुरक्षा दिली गेली आहे तर चार-पाच तरुण येत धक्का कसा मारु शकतात. नंदीग्राम येथे बॅनर्जी आज राहणार होत्या परंतु या घटनेनंतर त्या कोलकाता येथे रवाना झाल्या आहेत.(Uttarakhand: मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी दिला पदाचा राजीनामा; जाणून घ्या कोण होऊ शकते उत्तराखंडचे नवे Chief Minister)

Tweet:

यावर आता भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गी यांनी ममता बॅनर्जी यांचे हे नाटक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असे म्हटले की, ममता बॅनर्जी यांचा निवडणूकीत पराभव होणार असल्याचे दिसत असल्याने सहानभुती मिळवण्यासाठी असे त्या नाटक करत आहेत. पण दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी यांनी नंदिग्रामच्या स्थानिकांना त्यांनी मला लक्षात ठेवावे आणि टीएमसीचाच बंगालमध्ये विजय होईल असे म्हटले आहे.