तृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांचा विमानतळावर रास्ता रोको
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Photo credit: ANI)

काही दिवसांपासून शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा या वादाने डोके वर काढले होते. या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai)  यांनी उडी घेतली होती. तर आज तृप्ती देसाई केरळात दाखल झाल्याने आंदोलकांनी त्यांना विमानतळावरच रोखून ठेवले आहे.

केरळमधील शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आज तृप्ती देसाई कोचीच्या विमानतळावर पहाटे पोहचल्या आहेत. परंतु विमानतळाच्या बाहेर उभ्या असलेल्या आंदोलकांनी त्यांना विमानतळाच्या बाहेर पडण्यास मार्गच दिला. त्यामुळे तृप्ती देसाई या 17 नोव्हेंबर रोजी मंदिरात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

मात्र अयप्पा धर्मसेनेचे राहुल ईश्वर यांनी असे सांगितले की, 'जर तृप्ती देसाई मंदिरात येणार असल्यास आम्ही जमिनीवर झोपू, विरोध करु. मात्र त्यांना मंदिरात येऊ देणार नाही'. असे वक्तव्य केले आहे.