राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज ट्विटर या प्रसिद्ध Micro Blogging साईटवर आपले खाते उघडले आहे .@DrMohanBhagwat या ट्विटर (Twitter) हॅण्डल वरून मीडिया आणि सामान्य जनतेच्या ते संपर्कात राहतील, अवघ्या काहीच तासात भागवत यांच्या अकाउंटला तब्बल 15 हजारहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे, यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) , नितीन गडकरी (Nitin Gadkari) , सुरेश प्रभू (Suresh Prabhu) , पियुष गोयल (Pityush Goyal) व जगत प्रकाश नड्डा (Jagat Prakash Nadda) या मंडळींचा सुद्धा समावेश आहे. मात्र भागवत यांनी अद्याप केवळ एकाच अकाउंट ला फॉलो केले आहे. हे अकाउंट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) किंवा कोण्या बड्या नेत्याचे नसून संघाचे अधिकृत अकाउंट आहे.
मोहन भागवत यांच्या पाठोपाठ संघातील सह वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा ट्विटर वर पदार्पण केले आहे. यामध्ये भैय्याजी जोशी, सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, वी भागय्या, अरुण कुमार आणि अनिरुद्ध देशपांडे यांचा समावेश आहे. येत्या काळात संघ कार्यकारिणीतील इतर नेतेही ट्विटरवर येणार असल्याची माहिती संघाने दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 2011 पासूनच ऑफिशियल ट्विटर हॅण्डल होते त्याला 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स सुद्धा आहेत. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान संघ-भाजपने मोठ्या प्रमाणात ट्विटरचा वापर केला होता . मात्र तरीही आतापर्यंत संघाचे वरिष्ठ नेते ट्विटरपासून अंतर राखून होते.आपण कधीही ट्विटरचा वापर करणार नाही असे ठाम मत देखील या मंडळींनी मांडले होते मात्र आता त्यांच्या ट्विटरवरील आगमनामुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना दहशतवादी तर योगी आदित्यनाथ यांना बलात्कारी म्हणत गायिका हार्ड कौर हिने केली खळबळजनक पोस्ट
दरम्यान, अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 95 वर्षं पूर्ण झाली असून येत्या काळात संघटनेची डिजीटल माध्यमातील प्रतिमा आणि कार्यपद्धती बदलली जाणार असल्याचे सांगितले जात होते. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता जनतेशी व विशेषतः तरुणांशी जोडलेले राहण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचा अंदाज बांधला जात आहे.