खोट्या आरोपांमुळे कुटुंबीय त्रस्त - ED च्या छापेमारीविरुद्ध रॉबर्ट वद्रा यांचा आरोप
रॉबर्ट वद्रा (फोटो सौजन्य- ANI)

मंगळवारी 11 डिसेंबर रोजी पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे काल निकाल लागले. तर काँग्रेसने भाजपला हरवत आपले वर्चस्व राज्यामध्ये प्रस्थापित केल्याचे दृश्य निर्माण झाले आहे. मात्र सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई रॉबर्ट वद्रा (Robert Vadra) यांनी केंद्रसरकारवर टीका केली आहे. ईडीने केलेल्या तपासणीवरुन त्यांनी ही टीका केल्याचे सांगितले जात आहे.

रॉबर्ट वद्रा यांच्यावर ईडी(ED)ने 2015 रोजी राजस्थानमधील बिकानेर येथील जमीनव्यवहार प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली होती. त्यामुळे ईडी या प्रकरणी तपास करत असून वद्रा यांच्याही कंपन्यांचा समावेश आहे. मात्र वद्रा यांच्याकडून ईडीवर टीका करण्यात येत आहे. त्यांनी एएनआय (ANI)ला दिलेल्या वृत्तात असे सांगितले आहे की, 'माझ्याविरोधातील सर्व आरोप राजकीय कारणांमुळे लावले जात आहेत. मी प्रत्येक नोटीसला उत्तर दिले आहे. मात्र या प्रकरणी माझे कुटुंबीय ताणतणामध्ये येत आहेत. आईची प्रकृती ही ठीक नाही आहे. माझ्या संपूर्ण घराचे नुकसान झाले असून घराचे कुलूप तोडण्यात आले आहे. त्यामुळे सर्व काही कायद्यानिशी व्हायला हवे' असे विधान वद्रा यांनी केले आहे.

तसेच राजकीय कटामध्ये फसविण्यासाठी हे सर्व केले जात आहे. मी देश सोडून पळ काढणार नसल्याचे ही वद्रा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तपास निष्पक्ष आणि कायदेशीर मार्गाने करावा असे वक्तव्य वद्रा यांनी केले आहे.