Lok Sabha Elections 2019: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Congress President Rahul Gandhi ) यांनी केरळ राज्यतील वायनाड लोकसभा मतदारसंघातून (Wayanad Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. या वेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi-Vadra) यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. निवडणूक अर्ज दाखल केल्यावर राहुल आणि प्रियंका यांनी मिळून वायनाड येथे रोड शो केला. दरम्यान, या रोड शो ( Roadshow of Rahul Gandhi) वेळी वापरण्यात आलेल्या ट्रकचा रॉड तुटल्याने काही (नेमका आकडा समजू शकला नाही) पत्रकार जखमी झाले. या वेळी राहुल गांधी या पत्रकारांना मदत करताना पाहायला मिळाले. रॉड तुटून अचानक घडलेल्या या प्रकाराने उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर काही मिनिटांतच वातावरण पूर्ववत झाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वीही एका जखमी पत्रकाराला मदत करताना दिसले आहेत. अपघात झाल्यावर रस्त्यावर मदतीची प्रतिक्षा करत असलेल्या एका पत्रकाराला राहुल गांधी यांनी लिफ्ट दिली. राहुल यांनी या पत्रकाराच्या जखमेतून वाहणारे रक्त स्वत: पुसले आणि त्याला रुग्णालयातही दाखल केले होते.
Thousands of people have gathered around Wayanad, Kerala for Congress President @RahulGandhi's road show after he filed his nomination. #RahulGandhiWayanad #RahulTharangam pic.twitter.com/cri5zAu8Ru
— Congress (@INCIndia) April 4, 2019
राहुल गांधी हे आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच अमेठी या पारंपरीक मतदारसंघाशिवाय आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भारत हा एकसंध असल्याचा संदेश देशभर पोहोचविण्यासाठीच आपण केरळमधून निवडणूक लढवत आहोत. खास करुन इथल्या जनतेने मला निमंत्रित केल्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करुनच आपण वायनाड येथून निवडणूक लढवत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, व्हिडिओ: राहुल गांधी यांनी स्वत: पुसले अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्याचे रक्त)
Kerala: Congress President Rahul Gandhi holds a roadshow in Wayanad after filing nomination. Priyanka Gandhi Vadra and Ramesh Chennithala also present pic.twitter.com/kAW08X22u0
— ANI (@ANI) April 4, 2019
दरम्यान, 2014 ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून लढले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या त्यांच्या विरोधात मैदानात होत्या. स्मृती इराणी यांचा 2014मध्ये राहुल गांधी यांनी पराभव केला होता.