उपेंद्र कुशवाह यांचा केंद्रीय राज्यमंत्री पदावरुन राजीनामा
उपेंद्र कुशवाह (फोटो सौजन्य-ANI)

एनडीचा (NDA) भाग असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha)  यांनी सोमवारी एनडीएच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा ही राजीनामा दिला आहे.

एएनआयने (ANI) दिलेल्या वृत्तानुसार, कुशवाह यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशानापूर्वीच एनडीए सोबत होणाऱ्या बैठकीला जाण्यास नकार दिला. तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्रीपदासाठी सुद्धा त्यांनी राजीनामा देत असल्याचे सांगितले.

कुशवाह यांचा राजीनामा हा 40 लोकसभेसाठी जागा असलेल्या बिहारच्या राजकरणाची समीकरणे पालटू शकतात असे सांगितले जात आहे.