प्रियांका गांधी आणि प्रियांका गांधी (फोटो सौजन्य-INC)

लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Elections) रणधुमाळीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केला जात असून त्यावर वाद वाढत चालला आहे. तर सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांच्या तक्रारी नंतर गृहमंत्रालयाने त्यांना नोटीस धाडण्यात आली असून 15 दिवसात यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. भाजप पक्षाने असे म्हटले आहे राहुल गांधी यांनी ते भारतीय आहेत की ब्रिटिश असल्याचे कबुल करावे.

भाजपने (BJP) राहुल गांधी यांच्या नागरिकत्वार उचलून धरलेल्या प्रश्नावर आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उत्तर दिले आहे. तर सर्व भारताला माहिती आहे राहुल गांधी हे भारतीय असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेला आरोप हा खोटा आहे. राहुल गांधी हे भारतातच वाढले असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.(राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याची सुब्रह्मण्य स्वामी यांची तक्रार, गृहमंत्रालयाने धाडली नोटीस)

सुब्रह्मणम स्वामी यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये राहुल गांधी यांनी बॅककूप्स लिमिटेड येथे संचालक आणि सचिव आहेत असे म्हटले आहे. त्याचसोबत 2005-2006 मध्ये दाखल करण्यात आलेल्या वार्षिक रिटर्नमध्ये राहुल गांधी यांची जन्मतारीख 19 जून 1970 असून नागरिकत्व ब्रिटिश असल्याचे घोषित केले आहे.