राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याची सुब्रह्मण्य स्वामी यांची तक्रार, गृहमंत्रालयाने धाडली नोटीस
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वातावरण आहे. याच पार्श्वभुमीवर आता काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वातावरण आहे. याच पार्श्वभुमीवर आता काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. तर भाजप (BJP) पक्षाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या विरोधात प्रश्न उपस्थित केला असून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस धाडली आहे. त्यामध्ये राहुल गांधी ब्रिटिश असल्याचे म्हटले असून त्यांनी आपली भुमिका स्पष्ट करण्यासोबत पुरावे सुद्धा सादर करा असे सांगण्यात आले आहे. तर 15 दिवसात या नोटीसाला उत्तर देण्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये राहुल गांधी यांनी बॅककूप्स लिमिटेड येथे संचालक आणि सचिव आहेत असे म्हटले आहे. त्याचसोबत 2005-2006 मध्ये दाखल करण्यात आलेल्या वार्षिक रिटर्नमध्ये राहुल गांधी यांची जन्मतारीख 19 जून 1970 असून नागरिकत्व ब्रिटिश असल्याचे घोषित केले आहे.(अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नेस वाडिया यांना अटक; कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा)
तर काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची अमेठी येथील उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी रिटर्निंग अधिकाऱ्यांकडे अपक्ष उमेदवार धुव्र लाल यांनी केली होती. तसेच निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज तपासून पाहिला नसल्याचे ही बोलले गेले होते.
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2019 01:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

