Famous businessman and owner of IPL team Kings XI Punjab Ness Wadia. (Photo Credit: PTI)

प्रीती जिंटा (Preity Zinta) चा एक्स-बॉयफ्रेंड, आणि किंग्स इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचे मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांना जपान मध्ये अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगण्याच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फायनांशियल टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. नेस वाडिया यांच्याजवळ मार्चमध्ये 25 ग्रॅम कॅनाबिस रेसिन (Cannabis Resin) आढळले होते, ज्यामुळे त्यांना न्यू चिटोज एअरपोर्टवर अटक करण्यात आली. याबाबत वाडिया यांनी कबुलीनामादेखील दिला होता. या प्रकरणात नेस वाडिया यांना 20 मार्च रोजी दोषी ठरवण्यात आले होते.

(हेही वाचा: मुंबईमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई; डोंगरी पोलिसांचे यश)

जपानमध्ये सर्व प्रकारचे ड्रग्स बॅन आहेत. रग्बी वर्ल्डकप 2020 च्या पार्श्वभूमिवर अंमली पदार्थविरोधी कायदे हे आणखीन कठोर करण्यात आले. नेस वाडिया यांच्याकडे ड्रग्ज असल्याबद्दल स्निफर डॉगच्या साहाय्यानं सीमा शुल्क अधिकाऱ्यांना याबाबतचा अलर्ट मिळाले होते. त्याद्वारे त्यांना विमानतळावर अटक करण्यात आली, नंतर वाडिया यांनी आपल गुन्हा देखील कबुल केला आहे.