निवडणूकीचे रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashanat Kishor) यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये बैठक अद्याप सुरुच आहे. सुत्रांच्या मते, बैठकीला प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत सुद्धा उपस्थितीत आहेत. अशा चर्चा सुरु आहेत की, राहुल गांधी यांच्या सोबतच्या बैठकीदरम्यान प्रशांत किशोर पंजाब संदर्भात बातचीत करत आहेत. तर काही महिन्यांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी प्रशांत किशोर यांना आपले सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर किशोर यांनी आमदार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती.
निवडणूक राज्य पंजाब मध्ये सत्तारुढ काँग्रेस वादात अडकली आहे. तो मिटवण्यासाठी काही बैठका सुद्धा झाल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वीजेसह अन्य विविध मुद्द्यांवरुन टीका केली होती. सिद्धू यांचे असे म्हणणे होते की, गुरु ग्रंथ साहिब यांच्या बलिदानाप्रकरणी कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी योग्य पावले उचलली जात नाही आहेत.(People's Padma: जनतेच्या शिफारसीच्या आधारे दिला जाणार 'पीपल्स पद्म पुरस्कार; नामांकन देण्याचे पीएम नरेंद्र मोदी यांचे आवाहन)
दरम्यान, गेल्या महिन्यात प्रशांत किशोर यांनी तीन वेळा एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तर प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूच्या डीएमके युतीच्या यशात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. यापूर्वी आँध्र प्रदेशात सत्तारुढ वायएसआर काँग्रेस आणि दिल्लीतील आम आदमी पार्टीसाठी सुद्धा प्रशांत किशोर यांनी रणनिती ठरवली होती.