PM Modi Swearing-in Ceremony 2019: शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेना खासदार अरविंद सावंत (Photo Credits-Twitter)

दिल्ली (Delhi) मध्ये आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली. या सोहळ्याला राजकरणातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती दिसून आली. त्याचसोबत आजच्या शपथविधी सोहळ्यात शिवसेना खासदार अरविंद (Arvind Sawant) सावंत यांच्याकडे मंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अरविंद सावंत यांच्या नावाची शिफारस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.

अरविंद सावंत हे भाजप प्रणित NDA 2 सरकारमधील शिवसेनेचे शपथ घेणारे पहिले आणि एकमेव खासदार आहेत. शिवसेना हा भाजपचा खूप जूना मित्र आहे. हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक 2019 युती द्वारे एकत्र लढले होते. एकत्र निवडणूक लढण्याचा दोन्ही पक्षांना मोठा फायदा झाला. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उमेदवार निवडूण आले.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेस उमेदवार मिंलिंद देवरा यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीमध्ये अरविंद सावंत यांनी 1 लाख मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. तर शिवसेनेकडून अरविंद सावंत यांना विकास मंत्रालय किंवा ऊर्जा विभागाची धुरा सांभाळायला द्यावी अशी अपेक्षा केली जात होती. यंदा अनंत गीते यांची जागा अरविंद सावंत यांनी घेतली आहे.(मोदी सरकार शपथ विधी सोहळा 2019: शिवसेना खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रिपदाची शपथ; संजय राऊत यांची माहिती)

अरविंद सावंत यांनी यापूर्वी महानगर टेलिफोन नेटवर्क लिमिटेड येथे 1995 पर्यंत इंजिनिअर पदावर कार्यरत होते. तर 1995 मध्ये शिवसेना भाजप सरकार सत्तेत आल्यावर राज्यपाल कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेत वर्णी लागल्यानंतर एमटीएन मधून स्वैच्छिक सेवानिवृ्त्ती घेतली होती. त्याचसोबत 2014 मध्ये प्रथमच अरविंद सावंत यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.