PM Modi Swearing-in Ceremony 2019: नरेंद्र मोदी यांच्या दुसर्या शपथविधी सोहळ्यासाठी आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये तयारी सुरू आहे. एनडीएला मिळालेल्या बहुमतामध्ये महाराष्ट्राच्या शिवसेनेचाही समावेश आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 7 वाजता रंगणार्या शपथविधीमध्ये कोणकोणते मंत्री शपथ घेणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलेल्या माहितीनुसार आज शिवसेना खासदार अरविंद सावंत(Arvind Sawant) मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी घेतली अटलबिहारी वाजपेयी, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं दर्शन; शहीदांनाही श्रद्धांजली
Sanjay Raut, Shiv Sena: From Shiv Sena one leader will take oath as a minister. Uddhav ji has given Arvind Sawant's name, he will take oath as a minister. pic.twitter.com/P1SYqTubqD
— ANI (@ANI) May 30, 2019
अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. कॉंग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा त्यांनी पराभव केला आहे.अरविंद सावंत यांच्यासोबतच नितीन गडकरी, रामदास आठवले, पियुष गोयल, सुरेश प्रभू या माजी मंत्र्यांना यंदाच्या मोदी सरकारमध्येही मंत्रिपद मिळणार आहे. सोबत अरविंद सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार अरविंद सावंत सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहे.
आजच्या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे सपरिवार सहभागी होणार आहेत.राष्ट्रपती भवन पटांगणात संध्याकाळी सात वाजता होणार्या मोदी सरकारच्या दुसर्या पर्वाच्या शपथविधीला 14 राष्ट्रांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.