नरेंद्र मोदी यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी घेतली अटलबिहारी वाजपेयी, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं दर्शन; शहीदांनाही श्रद्धांजली  (Watch Video)
Visuals of Narendra Modi paying tribute at Atal Samidhi, National War Memorial | (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूक 2019 निकालामध्ये बहुमत मिळाल्यानंतर आज एनडीए सरकारच्या दुसर्‍या पर्वाला सुरूवात होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज दुसर्‍यांदा दिल्लीत पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. या भव्य शपथविधी सोहळ्यापूर्वी त्यांनी महात्मा गांधी यांच्या 'राजघाट', अटल बिहारी वाजपेयी  यांच्या सदैव अटल स्मृतिस्थळाला भेट देऊन आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोबतच शहीदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांनी National War Memorial ला भेट दिली. या प्रसंगी त्यांच्यासोबत तिन्ही सेनादलाचे प्रमुख आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आज होणार संपन्न, 8000 लोकांच्या उपस्थितीत रंगणार हा भव्यदिव्य सोहळा

अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीला वंदन

शहिदांना मानवंदना 

राजघाटला भेट

आज संध्याकाळी पार पडणार्‍या शपथसोहळ्यामध्ये 6,500 हून अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहे. 14 राष्ट्रांचे प्रमुख राष्ट्रपती भवनाच्या पटांगणात पार पडणार्‍या मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे सपरिवार उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेकडून अरविंद जाधव, भावना गवळी यांचा मंत्रिमंडळात सहभाग होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7 वाजता या भव्य सोहळ्याला सुरूवात होणार आहे.