PM Modi Swearing-in Ceremony 2019: नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नितिन गडकरी यांची मंत्री म्हणून वर्णी
Nitin Gadkari (Photo Credits-ANI)

PM Modi Swearing-in Ceremony 2019: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (30 मे) दिल्लीत (Delhi) राष्ट्रपती भवनात पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्री सुद्धा आपल्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील खासदार नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांची मंत्री पदासाठी वर्णी लागली आहे.

तर मोदी यांच्या मंत्रिमंडळात नागपूर खासदार नितिन गडकरी यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे गडकरी यांना मंत्री पद निश्चित झाले. तसेच गडकरी यांनी गेल्यावेळी रस्ते वाहतूक मंत्रालय उत्तमरित्या सांभाळले होते. (नागपूर लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले; अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या लढतीत पाहा कोण आघाडीवर)

दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदार संघातून भाजप पक्षाचे नितिन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्यामध्ये लढत झाली होती. मात्र नागपूर मतदार संघ हा सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणूकीत नितिन गडकरी यांचा 657624 मताधिक्यांनी विजय झाला. तर नाना पटोलो यांचा पराभव करत नितिन गडकरी यांनी तेथे विजय मिळवला आहे.