Nitesh Rane Case: नितेश राणेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात राहण्याची मागणी
Nitesh Rane | (Photo Credit: Facebook )

संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आहे. नितेश राणेंच्या वकिलांनी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करून नितेश राणे यांना सावंतवाडी कारागृहाऐवजी रुग्णालयातच दाखल करण्यात आले आहे. मात्र, आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. वैभव नाईक म्हणाले, हा राजकीय रोग होता कामा नये. मात्र, वैभव नाईक यांनीही नितेश राणेंना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते शुक्रवारी सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते. संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिसांना सहकार्य केल्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असावी. मात्र या प्रकरणात आरोपींना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

नितेश राणे यांची प्रकृती आधीच ठीक नव्हती. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. याबाबत आम्ही न्यायालयाला माहिती दिली आहे. आता डॉक्टर योग्य तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात आले आहे असे नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितले. यामध्ये नितेश राणे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयातच ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. आणि त्यानां रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर नितेश राणे आणि राकेश परब यांना वैद्यकीय तपासणीसाठी ओरोस येथील रुग्णालयात नेण्यात आले. (हे ही वाचा Extortion Case: इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायात असलेल्या महिलेकडून 50 लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांकडे एसीपीसह पीआयविरोधात गुन्हा दाखल)

संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. दिवाणी न्यायालयाने नितेश राणेंची पोलिस कोठडीची मागणी फेटाळली नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे यांचे वकील आज सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.