Gujarat Election: गुजरात निवडणुकीत क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या घरात रणसंग्राम, रविंद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजा कडून बायको रिवाबा जडेजा विरुध्द तक्रार दाखल

निवडणुक गुजरातची (Gujarat Election) पण रणसंग्राम मात्र क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) घरात सुरु आहे असं म्हण्टलं तर हरकत नाही. कारण रविंद्रची बहिण आणि बायको या दोघिही वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. रविंद्र जडेजाची बायको रिवाबा जडेजाला गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Legislative Assembly Election) जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तरी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) भाजपाचा (BJP) निडणुकीचा दणक्यात प्रचार करत आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला जडेजाची बहिण नयनाबा जडेजा (Naynaba Jadeja) हिच्यावर जामनगर उत्तर मतदारसंघाची कॉंग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी आहे. दोघींही आपआपल्या पक्षाचा जोमाने प्रचार करताना दिसत आहेत पण यात आता राजकिय विरोधासह घरगूती वादाचीही सावली पडल्याचं दिसत आहे.

 

प्रचारादरम्यान दोघीही एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. तरी यावेळी तर नयनाबा (Nayanaba Jadeja) ह्यानी तर रिवाबा जडेजा (Riwaba Jadeja) विरोधात थेट निवडणुक आयोगात (Election Commission) तक्रार दाखल केली आहे. रिवाबा निवडणुक प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करीत आहे, एकप्रकारे ह्याला बाल मजूरी म्हणतात. याबाबतचा खुलासा खुद्द नयनाबा जडेजा यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेत केला आहे. (हे ही वाचा:- Aditya Thackeray Bihar Visit: आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादव यांची घेणार भेट)

 

तरी जामनगर उत्तर मतदार (Jamnagar North Constituency) संघातील लढत आता चूरसीची झाली आहे. नेमक कोण बाजी मारणार भाजप की कॉंग्रेस याबाबची उत्सुकता शिगेला पेटली आहे. तरी क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) घरातील हा रणसंग्राम थेट निवडणुकीचा निकाल आल्यानंतरचं शांत होईल. तरी १ ते ५ डिसेंबर दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुक पार पडणार असुन ८ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहिर करण्यात येईल.