Aaditya Thackeray Bihar Visit: आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादव यांची घेणार भेट
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज बिहार दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) युवा नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेतील. तेजस्वी यादव यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा होईल.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज बिहार दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) युवा नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेतील. तेजस्वी यादव यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा होईल. ते माझ्याच वयाचे उत्तम नेता आहेत. बिहारमध्ये त्यांचे काम चांगले चालले आहे. आजवर फोन वैगेरेंच्या माध्यमातून आमचे बोलणे होत होते. आता आम्ही प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार आहोत, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. आमच्या भेटीमध्ये केवळ विकास आणि त्याअनुषंघानेच चर्चा होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे युवा नेते आहेत.
बिहार दौऱ्यावर निघण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात राज्य सरकारवर तीव्र टीका केली. राज्य मंत्रिमंडळाची आज पार पडणारी बैठक रद्द झाली. त्यावरुन राज्य सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्रिमंडळ गुजरात विधानसभा निवडणुकीत व्यग्र आहेत. गुजरात निवडणुकीसाठी आजची मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्यात आली. त्यांचे प्रेम राज्यावर नाहीच. आगोदर आमदार पाठवले, मग प्रकल्प आणि आता मंत्रिमंडळच गुजरातला पाठवले, अशा शब्दात आदित्य यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. (हेही वाचा, Aaditya Thackeray: 'आगोदर आमदार, मग प्रकल्प आणि आता मंत्रिमंडळच गुजरातला पाठवले आहे', आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर तीव्र टीका)
सत्ताधाऱ्यांकडून केलेल्या जाणाऱ्या आरोप आणि वक्तव्यांबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, ते जे करत आहेत ती चिखलफेक आहे. त्या चिखलफेकीत मला जायचेच नाही. राज्याच्या विकासावर काही बोलायचे असेल तर बोला. मी त्याला उत्तरे देईन. ज्यांचे राज्यावर प्रेमच नाही त्यांच्याबद्दल काय बोलणार असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आजचा बिहार दौरा हा केवळ तरुण नेत्यांमधील संवाद असणार आहे. मी आणि तेजस्वी यादव समान वयाचे तरुण आहोत. बिहारमध्ये ते चांगले काम करत आहेत. त्यामुळे विकास आणि इतर गोष्टींवर आम्ही चर्चा करु. आजवर फोनद्वारे आमची चर्चा होत असे आता प्रत्यक्षात भेट होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. या भेटीत कोणताही राजकीय विषय नसेल असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि प्रादेशिक पक्ष यांची एखादी राष्ट्रीय आघाडी करण्याचा विचार आहे का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, लगेचच राष्ट्रीय आघाडीव वैगेरे असा काही विषय नाही. हा खूप मोठा विषय आहे. त्यावर आमचे मोठे नेते बोलतील. आज मी केवळ तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी निघालो आहे. ते छान काम करत आहेत. आमच्या विकासकामाबद्दलच चर्चा होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2022 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

