नवजोत सिंग सिद्धू यांनी दिला पंजाबच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा, मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याशी सुरु होता वाद
Navjot Singh Siddhu Resignation (Photo Credits- Twitter)

काँग्रेस मंत्री नवजोत सिंग सिद्धू (Navjot Singh Siddhu) यांनी ट्विटर वरून आपण पंजाबच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा (Punjab Cabinet Minister)  राजीनामा (Resignation) दिला असल्याची घोषणा केली आहे. सिद्धू यांच्या ट्विटनुसार त्यांनी 10 जून रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांना राजीनाम्याचे पत्र दिले होते. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पंजाब मध्ये काँग्रेस पक्षाची झालेली दयनीय अवस्था पाहता मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (CM Amrinder Singh)  यांनी पराभवाचे खापर सिद्धू यांच्या माथी फोडले होते, या वादामुळे 6  जून रोजी पार पडलेल्या पंजाबच्या मंत्रिमंडळात सिंह यांनी सिद्धू यांच्यासोबतच अन्य मंत्र्यांची खाती सुद्धा बदलली. अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या या वादाच्या सत्रानंतर सिद्धू यांनी हा नाराजीनामा दिला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.

नवजोत सिंग सिद्धू ट्विट

नवजोत सिंग सिद्धू हे काँग्रेस पक्षाचे मंत्री असून त्यांच्याकडील  नागरी प्रशासन विभाग काढून ऊर्जा खात्याचा भार सोपविण्यात आला होता. तसेच,सिद्धू यांच्याकडील पर्यटन आणि सांस्कृतिक खातंही काढून घेण्यात आलं होतं. या वर्षीच्या सुरवातीपासून पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या दिशेने झुकणारी विधानं असो वा लोकसभा निवडणुक दरम्यान मोदींवर चढवलेला शाब्दिक हल्ला या सर्वच कारणांमुळे सिद्धू वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळाले होते. नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर चप्पल फेकून मारणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक

दरम्यान, सिद्धू यांनी  9 जून ला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर बरेच दिवस राहुल गांधी यावर काही प्रतिक्रिया देतील याची सिद्धू यांनी वाट बघितली मात्र तसे काहीही न झाल्याने आज, अखेरीस त्यांनी आपल्या  ट्विटर अकाउंट वरून याबाबतची घोषणा केली आहे.