पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कॅबिनेट बैठक, राष्ट्रपती रामनाथ कोविंद लावणार उपस्थिती
Narendra Modi and Amit Shah (Photo Credits- ANI)

यंदा लोकसभा निवडणुक 2019 चे निकाल काल (23 मो) जाहीर झाले. या निकालामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना जनतेने बहुमताने जिंकून देत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर आजपासून नवे सरकार स्थापन होण्यासाठी हालचाली सुरु होणार आहेत. नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेणार असून पुढील पाच वर्षाच्या कामाची रणनिती ठरविणार असल्याची शक्यता आहे.

तर या बैठकीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुद्धा उपस्थिती लावणार आहेत. तत्पूर्वी नरेंद्र मोदी आज आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा रामनाथ कोविंद यांच्याकडे सोपवणार आहेत. तर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी यांना पंतप्रधान पद देण्यात आल्यानंतर 26 मे रोजी त्यांनी शपथ घेतली होता. मात्र यंदासुद्धा 26 मे रोजी पुन्हा शपथ घेणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.(Lok Sabha Elections 2019 Results: लोकसभा निवडणूक 2019 निकाल लागताच नरेंद्र मोदी यांनी नावाच्या पुढून चौकीदार शब्द हटवला, ट्विटवरून दिले 'हे' कारण)

त्याचसोबत अमित शहा यांनीसुद्धा 25 मे रोजी आपल्या पक्षातील खासदारांना दिल्ली येथे बोलावले आहे. तर गुरुवारी जाहीर झालेल्या निकालानंतर भाजपला 303 जागा, एनडीएला 348, युपीएला एकूण 94 जागांपैकी 52 जागा मिळाल्या आहेत.