Lok Sabha Elections 2019 Results: लोकसभा निवडणूक 2019 निकाल लागताच नरेंद्र मोदी यांनी नावाच्या पुढून चौकीदार शब्द हटवला, ट्विटवरून दिले 'हे' कारण
'Chowkidar' word Removed From PM Narendra Modi, Amit Shah's name on Twitter (Photo Credits: Twitter)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2019)  प्रचाराच्या रणधुमाळीत ज्या शब्दामुळे असंख्य वाद झाले तो चौकीदार (Chowkidar)  हा शब्द नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटच्या नावापुढून काढून टाकला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी भाजपा नेते व अन्य समर्थकांना देखील असे करण्याचे आवाहन करत एक ट्विट पोस्ट केले आहे.त्यामुळे मोदींच्या पाठोपाठच भाजपा अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) ,केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) , स्मृती इराणी (Smriti Irani) तसेच ,महाराष्टाचे ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आपल्या नावापुढील चौकीदार शब्द हटवला आहे.

नरेंद्र मोदी ट्विट 

या ट्विटमार्फत मोदीनी आपण आपल्या नावापुढचा चौकीदार शब्द काढून टाकत असलो तरी तो आपल्या कामातील अभिन्न भाग असणार आहे असे देखील स्पष्ट केले आहे. आपण चौकीदार म्हणून जातीय वाद , वर्णभेद , मत्सर यापासून आपल्या देशाचे रक्षण करावे या हेतूने हा शब्द वापरण्यात आला होता मात्र आता चौकीदार शब्दाचा उत्साह मनात कायम ठेवून आणखीन चांगले काम आपल्याला करायचे आहे असे देखील मोदी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

नरेंद्र मोदी ट्विट 

चौकीदार या शब्दावरून काँग्रेससहित अन्य पक्षातील नेत्यांनी देखील अनेक आक्षेपार्ह्य विधाने केली होती, त्यातही राहूल यांनी केलेल्या चौकीदार चोर है या वाक्याने तर देशात धुमाकूळ घातला होता यावरून राहुल गांधींना देखील अनेक टीकांना सामोरे जावे लागले होते. मात्र आता हा शब्द कायमचा गायब झाल्याने ही केवळ भाजपाचे निवडणुक पुरतीच मर्यादित खेळी होती अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालात भाजपाने मतांच्या शर्यतीत दमदार बाजी मारल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये व समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला अमलात आहे. भाजपा ला आतापर्यंत साधारण 340 मतदारसंघानमध्ये विजय प्राप्त होत असल्याचे काळात आहे त्यानुसार यंदा देखील देशात मोदींच्या नेतृत्वाखालींनी भाजपा सरकारची बिनविरोध सत्ता स्थापन होण्याची खात्री राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.