नारायण राणे (Narayan Rane) हे आता नव्या केंद्रीय एमएसएमई मंत्री रुपात कारभार सांभाळणार आहेत. राणे यांनी असे म्हटले की, मंत्रालय अधिक रोजगार सृजित करण्यासह जीडीपी वृद्धिचा वेग वाढवण्याच्या दिशेने काम करणार आहे. पुढे असे ही म्हटले की, मी आज पदभार घेतला. आम्ही जीडीपी मध्ये वेग आणण्यासाठी आणि तरुणांसाठी रोजगार सृजन उपायांवर खासकरुन लक्ष देणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांनी मंत्रालयाचा पदभार सांभाळण्यासाठी दाखल झाले तेव्हा त्यांनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांची शाळा घेतली. यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आली.
प्रश्न विचारल्यानंतर मंत्र्यांच्या स्वागतासाठी हातात फुलगुच्छ घेऊन उभे असलेल्या अधिकाऱ्यांनी राणे यांनी विचारलेले प्रश्न ऐकताच आजूबाजूला पाहू लागले. खरंतर नारायण राणे यांनी असा प्रश्न विचारला की, मंत्रालयाचे जीडीपीमध्ये किती योगदान आहे? तसेच गेल्या दोन वर्षात किती रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या? पुढे असा ही प्रश्न विचारला की, तुमच्या हातात कोणीही फाइल घेऊन आले नाही? कोण सांगणार हा डेटा? यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, काही लोक सुट्टीवर गेली तर काहीजण त्यांच्या घरी लग्न असल्याने उपलब्ध नाहीत त्यामुळे ते परतल्यानंतर डेटा उपलब्ध करुन देऊ.(Modi Cabinet Expansion: नव्या मंत्र्यांसह खातेवाटप जाहीर; Narayan Rane झाले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री; जाणून घ्या कोणाला मिळाले कोणते मंत्रालय See List)
नारायण राणे यांनी हे प्रश्न विचारल्यानंतर ते ऐवढ्यावरच थांबले नाही तर पुढे असे ही म्हटले की, किती कर्मचारी लग्नासाठी गेले आहेत. यामुळे अधिकारी गोंधळले. राणे यांनी अधिकाऱ्यांना संध्याकाळ पर्यंत पूर्ण डेटासह बैठकीत येण्यासाठी म्हटले आहे. ऐवढेच नव्हे अधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे ते नाराज झाले आणि म्हणाले की, जर काम आणि प्रदर्शन उत्तम नसल्यास सर्वांची बदली करीन.