Mohan Bhagwat Met AIIO Chief Umer Ahmed Ilyasi:  मुस्लिम धर्मगुरु म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत हे ‘राष्ट्रपिता’!
RSS प्रमुख मोहन भागवत (Photo Credit: ANI)

सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) कायमचं मुस्लिम (Muslim)

विरोध भुमिका मांडतात अशी चर्चा होते. कायमचं हिंदूवादी विचारांना अधिक महत्व देत मुस्लिम धर्माला डावल्याचा आरोप मोहन भागवतांवर (Mohan Bhagwat) होतो. पण मोहन भागवतांच्या एका भेटीची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल दिल्लीतील (Delhi) ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे (All India Imam Organization) प्रमुख उमर अहमद इलियासी (Umer Ahmed Ilyasi) यांची भेट घेतली. ही भेट विशेष होती कारण या भेटी दरम्यान उमर अहमद इलियासी आणि मोहन भागवत यांच्या सुमारे एक तास चर्चा रंगली. या भेटी दरम्यान हिंदू (Hindu) आणि मुस्लिम धर्माबाबत (Muslim Community) काही महत्वाची खलबत झाली अशी माहिती मिळते. या भेटीनंतर दिल्लीतील ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांनी मोहन भागवतांचं मोठं कौतुक केलं आहे.

 

ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे (All India Imam Organization) प्रमुख उमर अहमद इलियासी (Umer Ahmed Ilyasi) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांना ‘राष्ट्रपिता’ म्हटले आहे. तसेच उमर अहमद इलियासी (Umer Ahmed Ilyasi) म्हणाले, “मोहन भागवत (Mohan Bhagwat) जी आज माझ्या निमंत्रणावर आले होते. ते 'राष्ट्रपिता' आणि 'राष्ट्रऋषी' आहेत, याभेटीचा दोन्ही धर्मावर सकारात्म परिणाम होईल. तसेच हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim) धर्मियांची देवपूजा करण्याच्या पद्धती जरी भिन्न असली तरी सर्वात मोठा धर्म मानवता आहे. हिंदू असो वा मुस्लिम कुठल्याही धर्मापेक्षा देश अधिक महत्वाचा असं उमर अहमद इलियासी म्हणाले. (हे ही वाचा:- Nitin Gadkari: मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो, सरकारच्या भरवश्यावर राहू नका; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अनोखा सल्ला)

 

यापूर्वीही सरसंघचालक मोहन भगवत यांनी "सांप्रदायिक सुसंवाद मजबूत करण्यासाठी पाच मुस्लिम विचारवंतांची भेट घेतली होती. त्यानंतर उमर अहमद इलियासी यांच्या भेटीला अधिक महत्व आहे. एका महिन्यात मुस्लिम विचारवंतांशी आरएसएस प्रमुख मोहन भागवतांची ही दुसरी बैठक आहे. तरी देशातील हिंदू मुस्लिम समाजातील दोन मोठे नावं एकत्रीत येवून भेटीगाठी होणं यामुळे देशातील दोन्ही धर्मियांच्या भुवया उंचावल्या आहेत.