BMC Election 2022: चार राज्यात भाजपच्या विजयानंतर आता मिशन मुंबई? देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया, संजय राऊत यांनी दिले प्रत्युत्तर
Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

पाच राज्याचे विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election Result 2022) निकाल जाहीर झाले आहे. या निवडणकीच्या निकालाच भाजपला (BJP) चार राज्यात आपली सत्ता स्थापन करण्यास यशस्वी ठरले आहे. तर पंजाब (Punjab) मध्ये 'आप'ने काँग्रेसला (Congress) गुंडाळुन पहिल्यादांच 'आप'चा झेंडा फडकवला आहे. गुरुवारी या विजयाचे अभिनंदन मानत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेचे आभार मानले आहे. तसेच देशाच्या या चार वेगवेगळ्या भागांत भाजपने विजयाची सीमा निश्चित केली आहे. आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह एवढा वाढला आहे की, 'उत्तर प्रदेश ही झांकी आहे, महाराष्ट्र अजून दिसायचा आहे', असे महाराष्ट्रात बोलले जात आहे. त्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, आज (11 मार्च, शुक्रवार) मुंबईत गोव्यातील विजयाबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या स्वागतानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेबाबतही महत्वाचे वक्तव्य केले आहे.

हा लढा अजून संपलेला नाही - देवेंद्र फडणवीस

भाजपच्या मोठ्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकार आपल्या कृत्याने जाईल. भाजप सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. मात्र सरकार पडल्यास पर्यायी सरकार देण्याची आमची पूर्ण तयारी आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा लढा अजून संपलेला नाही. ही लढाई आता मुंबई महापालिका निवडणुकीत अधिक उत्साहाने लढवली जाणार आहे. हा लढा कोणत्याही पक्षाविरुद्ध नसून, हा लढा महापालिकेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध, गैरकारभाराविरुद्ध असणार आहे. (हे ही वाचा Maharashtra Budget 2022: अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात आज सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प)

संजय राऊत यांनी दिले प्रत्युत्तर

शुक्रवारी पत्रकारांनी संजय राऊत यांना याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, 'ये यूपी-गोवा झांकी, महाराष्ट्र बाकी.. हे सगळं आपण आजपासूनच नाही तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून ऐकत आहोत. शरद पवार म्हणाले आहे की, आम्हीही पण तयार आहोत. मुंबई महापालिकेत पुन्हा भगवाच फडकणार आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा एकही केस झुकवू शकणार नाही. जास्तीत जास्त ते काय करणार ते आमच्या रेड टाकतील. आजवर त्याने हेच केले आहे.