दुर्गापुर: रॅलीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवर लावले ममता बॅनर्जी यांचे पोस्टर, भाजप कडून सरकारवर हल्लाबोल
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (फोटो सौजन्य-ANI)

कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शनिवारी (2 फेब्रुवारी) पश्चिम बंगाल (West Bengal) येथे लोकसभा निवडणुकीसाठी अभियान सुरु करणार आहे. राज्यातील 24 जिल्हे आणि औद्योगिक नगर दुर्गापूर येथे मोदी यांच्या रॅलीचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी दुर्गापूर येथे मोदी यांच्या पोस्टरवरती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पोस्टर झळकवण्यात आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार केली आहे. तसेच बॅनर्जी यांच्या पोस्टर लावण्यावरुन विरोध केल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

भारतीय जनता पार्टी राहुल सिन्हा यांनी असे सांगितले की, दुर्गापूर येथे पंतप्रधान मोदी यांच्या रॅली पासूनच्या केवळ 50-70 मीटर दूर अंतरावर नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरच्यावरती ममता बॅनर्जी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. यावरुन असे कळते पश्चिम बंगाल येथे लोकशाही नावाची गोष्टच नाही आहे. तसेच आमच्या कार्यकर्त्यांनी या पोस्टरबाजीचा विरोध केल्यामुळे त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे ही सिन्हा यांनी सांगितले आहे. (जयंत सिन्हा पत्रकारांशी बोलत असताना पाठून वेडेचाळे करणारी मुलगी सोशल मीडियावर वायरल (Video)

नरेंद्र मोदी आज ज्या ठिकाणहून आगामी निवडणुकीसाठी अभियान सुरु करणार आहेत त्या ठिकाणाचे एक राजकीय महत्व आहे. येथे मातुआ समुदायाचे सर्वात जास्त गरीबी आहे. मूळ रुपात हा समाज पूर्व पाकिस्तान येथून स्थालांतरित होऊन येथे आला आहे. राज्यातील पाच जागांवर या समुदायाचा सरळ सरळ प्रभाव आहे. तर यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मालदा येथे आयोजित केलेल्या रॅलीत पश्चिम बंगालच्या सरकावर जोरदार टीकेची झोड उठविली होती..