अघाडी मोदी सरकारचे शुक्रवारी (1फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प (Intarim Budget)अतिरिक्त पदभार सांभळणारे पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी सादर केले. तसेच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सामान्य जनतेपासून ते राजकीय पक्षात चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याचसोबत सोशल मीडियावरसुद्धा अर्थसंकल्पाबाबत बोलबाला सुरु झाला आहे. त्यात सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ वायरल होत आहे.
या व्हिडिओतील मुलगी केंद्रीय मंत्री नागरिक उड्डयाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी (Jayant Sinha) काल सादर झालेल्या अर्थसंकल्पाबाबत मीडियाशी बोलत होते. त्यावेळी सिन्हा यांनी मोदी सरकारतर्फे मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. मात्र जेव्हा सिन्हा मीडियासोबत बोलत होते त्यावेळी त्यांच्या पाठी एक मुलगी वेडेचाळे करताना दिसून आली. पहिल्यांदा या मुलीने आजूबाजूला पाहिले. त्यानंतर काही मिनिटातच सिन्हा यांच्या मागून जिभ बाहेर काढून वेडेचाळे करण्यास सुरुवात केली. सध्या या मुलीचा व्हिडिओ सोशळ मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. (हेही वाचा-Budget 2019: अंतरिम अर्थसंकल्प रद्द करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल)
मात्र सिन्हा यांच्या पाठीमागून असे वेडेचाळे करणारी मुलगी कोण असा सर्वांना प्रश्न पडला आहे. तसेच आजूबाजूला इतर मंडळींचे लक्ष या मुलीकडे कसे गेले नाही याबद्दल ही बोलले जात आहे. तर मुलीने एकदा नाही तर तीनचार वेळा हा प्रकार सुरु ठेवल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे.