उद्धव ठाकरे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य-ANI)

Maharashtra Assembly Election 2019: येत्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षात तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप (BJP) पक्षाची दिल्लीत (Delhi) कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी बैठकीत मुख्यमंत्री पदाबद्दल बोलण्यात आले. तर अमित शहा (Amit Shah) यांनी विधानसभेच्या निवडणूकीसाठी शिवसेना (Shiv Sena)-भाजपची युती कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र मुख्यमंत्री भापच पक्षाचा असणार असे सांगितल्याने शिवसेनेत नाराजीचा सूर दिसून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीत रविवारी पार पडलेल्या बैठकीत विधासभा निवडणूकीबद्दल चर्चा करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्रासाठी भाजप पक्षाचा मुख्यमंत्री असावा असे वक्तव्य अमित शहा यांनी केले. यावेळी शिवसेना-भाजप पक्षातील नेते मंडळींनी उपस्थिती लावली होती.(Maharashtra Assembly Election 2019: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते, मंत्री, पदाधिकाऱ्यांची 'मातोश्री'वर बैठक; युतीच्या जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता)

तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेकडे अवजड मंत्रीपद दिल्याने त्यांच्यामध्येच आधीच नाराजगी होती. तर आता मुख्यमंत्री पदी भाजप पक्षाचा उमेदवार असल्याने शिवसेनेकडून खंत व्यक्त केली जात आहे.