Maharashtra Government Formation: सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून मिळाले सहमती पत्रक, 23 नोव्हेंबरला राज्यपालांची घेणार भेट - संजय राऊत
Sanjay Raut | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रातील राजकीय हालचालींचा वेग पाहता लवकरच सत्तास्थापनेच्या निर्णयाची घोषणा होणार असल्याचे दिसून येत आहे. त्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी एक मोठा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेला घेऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आग्रही असून या पक्षांतील आमदारांकडून त्यांच्या स्वाक्षरीसह समर्थन पत्रक तयार झाले आहे. NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला राज्यपालांचा वेळ मिळाल्यास हे समर्थन पत्र आम्ही त्यांच्या हाती सुपूर्त करणार आहोत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद यावर या तीनही पक्षांमध्ये अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. तर दुसरीकडे आज सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी काँग्रेस कमिटीची बैठक झाली. बैठकीनंतर असे सांगण्यात आले की, सरकार स्थापन करण्याबाबत उद्यापर्यंत अंतिम निर्णय जाहीर होऊ शकतो.

NDTV चे ट्विट: 

तसेच काल म्हणजेच 20 नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास 2 तास ही बैठक सुरु होती. बैठकीनंतर तीनही पक्षांची मिळून योग्य सरकार बनेल अशी घोषणा करण्यात आली. आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही चर्चा सुरु राहणार आहे.

'सत्तास्थापनेबाबत पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल'- संजय राऊत

“राज्यात 1 डिसेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अनेक सकारात्मक चर्चा झाली असून सरकार स्थापनेसंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतले असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे आणि लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल,” अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.