'सत्तास्थापनेबाबत पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल'- संजय राऊत
Sanjay Raut | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाली असून अजूनही राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने भापज-शिवसेना (BJP-Shivsena) महायुतीच्या बाजून कौल दिला होता. परंतु, मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद सुरु झाला. दरम्यान, भाजपने विरोधी बाकावर बसणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेने सत्तास्थापन करण्याचा विडा उचलाला आहे. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. नुकतीच शिवसना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मुंबई (Mumbai) येथे पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान, त्यांनी केलेल्या वक्तव्याने संपूर्ण जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राला लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळणार असून सत्तेस्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे संजय राऊत म्हणाले आहेत. यासाठी संजय राऊत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरीदेखील राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच राज्यातील सत्तेस्थापनेची तिढा सुटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात 1 डिसेंबर अगोदरच सत्ता स्थापन होणार असून सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी आज ते शरद पवार यांची भेट घेऊन सरकार स्थापनेबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच देशाची घटना सेक्युलर या शब्दावर आधारीत आहे. असेही संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- 'राज्यामध्ये सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही'- सुभाष देशमुख

एएनआयचे ट्वीट-

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज मुंबई येथे  बैठक होणार आहे. या बैठकीनंतर दोन्ही पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महाराष्ट्रात लवकरच सत्ता स्थापन होणार आहे, असा दावा अनेक पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.