मध्य प्रदेशात गेल्या दहा दिवसात 4 भाजप नेत्यांची हत्या, सरकारविरुद्ध सडकून विरोध
BJP leader Shot Dead | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशात सरकार बदल झाला नाही तोच गुन्हेगारी आणि गुन्हे करण्याचे मार्ग बदलले आहेत. गेल्या एका आठवड्यात भाजप (BJP) नेत्यांची हत्या आणि पक्षावर टीका यामुळे राज्यात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (20 जानेवारी) बलवडी येथे भाजप नेता मनोज ठाकरे यांची अज्ञातांकडून निघृण हत्या करण्यात आली.या हत्येचे पडदास दिल्लीपर्यंत जाऊन पोहचले आहेत. भाजप पक्षाने या हत्येला एक राजकीय वळण लाभले असून या घटनांविरुद्ध सर्वत्र विरोध केला जात आहे.

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) बरवानी जिल्ह्यातील बलवडी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका भाजप (BJP) नेत्याची निघृण हत्या करण्यात आल्याती धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नेत्याचा पोलीस स्थानकाच्या परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.तर पोलिसांकडून हत्येप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. (हेही वाचा-मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची निघृण हत्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरु)

तसेच रविवारी गुना येथे परमाल कुशवाह या तरुणावर गोळीबार करण्यात आला. परमास कुशवाह हा भारतीय जनता पार्टीचे पालक संयोजक शिवराम कुशवाह यांचा नातेवाईक होता. ज्या लोकांनी गुना येथे हत्याकांड केले आहे ते सर्वजण काँग्रस पक्षातील असल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवारी (17 जानेवारी) संध्याकाळी मंदसौर नगरपालिकेसाठी दोन वेळा निवडून आलेले भाजप नेते प्रल्हाद बंधवार यांच्यावर भर बाजारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सरकार या हत्याकांडाची गंभीरतीने दखल घेण्यापेक्षा राजकीय वळण देत आहे. बांधवार हे गुरुवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास जिल्हा सहकारी बँकेच्या समोरील भाजप नेता लोकेंद्र कुमावत यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी जसे बंधवार दुकानातून बाहेर पडले त्याचवेळी दुचाकीवरुन येणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळ येऊन डोक्यात गोळी झाडली. कोणाला या व्यक्तीबद्दल कळण्यापूर्वीच दुचाकी घटनास्थळी सोडून आरोपी तेथून पसार झाला होता. असे सांगितले जात आहे की, गोळी झाडणारा व्यक्ती एक शार्प शूटर आहे.

बुधवार (16 जानेवारी) संध्याकाळी इंदौर येथे उद्योजक संदीप अग्रवाल या व्यक्तीवर भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. अद्याप हत्या करणाऱ्या आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. इंदौर येथील गजबजलेल्या ठिकाणी पोलीस स्टेशनपासून जवळजवळ 100 पावलांवर शहरातील प्रसिद्ध हायप्रोफाईल बिल्डरवर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार करताना संदीप अग्रवाल याचा मृत्य़ू झााला.

या घडलेल्या हत्याकांडामुळे मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरुन या घटनांचे समर्थन करत आहेत. तसेच काँग्रेस सरकारला या घटानांवर अंकुश न मिळवता आल्याने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.