मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची निघृण हत्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरु
भाजप नेता मनोज ठाकरे (फोटो सौजन्य-ANI)

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) बरवानी जिल्ह्यातील बलवडी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका भाजप (BJP) नेत्याची निघृण हत्या करण्यात आल्याती धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नेत्याचा पोलीस स्थानकाच्या परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मनोज ठाकरे असे या भाजप नेत्याचे नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, मनोज हे दररोजच्या प्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. दरम्यान, मनोज यांची अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आली असून त्यांचे डोके दगडाने ठेचले होते. या प्रकरणी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु करण्यास सुरुवात केली आहे. (हेही वाचा-विरोधी पक्षांचे एकत्रिकरण हे माझ्या नाही देशातील जनतेच्या विरोधात- नरेंद्र मोदी)

तर ठाकरे यांच्या हत्येमागील कारण अद्याप कळू शकले नाही. परंतु पोलिसांकडून मृतदेह आढळलेल्या ठिकाणी कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने स्थानिक नगर पालिका अध्यक्ष प्रल्हाद बंधवार यांच्यावर गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला होता.