
Madhya Pradesh Assembly Elections Results 2018: मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2018चे चित्र हळहळू स्पष्ट होत आहे. एकूण 230 जागांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता अद्यापही कायम आहे. अपेक्षेप्रमाणे भाजप आणि काँग्रेसमध्येच प्रमुख संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र, मयावती यांचा बहुजन समाज पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. निकालाबाबत सद्या जे चित्र दिसत आहे ते पाहता, भाजप 113 जागांवर आघाडीवर आहे तर, काँग्रेस 106 जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, 11 जागांवर इतर पक्ष आखाडीवर आहेत. बऱ्याच काळापासून भाजप आणि काँग्रेसमध्ये 4 ते 6 जागांच्या फरकाने संघर्ष सुरु आहे. कधी काँग्रेस बाजी मारत आहे तर, कधी भाजप मागे जात आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या रुपात गेली 15 वर्षे भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे जनता काहीशी सत्तापरिवर्तानाच्या विचारात असल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण रस्सीखेच पाहाता भाजप पराभावाच्या छायेत आहे. तसेच, जर भाजप विजयी झालाच तर जय पराभवाच्या आकड्यांमध्ये फार तफावत असणार नाही असे दिसते. (हेही वाचा, राम मंदिर सोडा, विकासाच्या मूळ मुद्द्याकडे परत फिरा: खा. संजय काकडे)
दरम्यान, राजस्थानमध्ये 199 जागांपैकी काँग्रेस 102 जागांवर आगाडीवर आहे. तर, भाजप 72 जागांवर. इतर पक्ष 25 जागांवर आगाडीवर आहेत. छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागांपैकी 17, काँग्रेस 66 आणि इतर 7 जागांवर आगाडीवर आहेत. दुसरीकडे तेलंगणामध्ये टीआरएस 85, काँग्रेस+टीडीपी 23, भाजप केवळ 3 तर इतर 8 जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, मिझोरामध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव झाल्यामुळे तेथे काँग्रेसची सत्ता गेली आहे.