Lok Sabha Elections 2024 Exit Polls: Times Now- ETG च्या अंदाजानुसार भाजपा 'दिल्ली' जिंकणार
राजकीय
टीम लेटेस्टली
|
Jun 01, 2024 08:52 PM IST
लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिल 2024 पासून सात टप्प्यांमध्ये सुरू झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections) च्या मतदानाचा सातवा टप्पा आज पार पडला आहे. त्यानंतर आता उमेदवारांसह देशातील नागरिकांना निकालाचे वेध लागले आहेत. यामध्ये आज एबीपी सी व्होटर (ABP C Voter), चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, या संस्था, न्यूज चॅनल्स आपले अंदाज आज व्यक्त करणार आहेत. त्यामुळे 4 जून दिवशी मतमोजणी पूर्वी निकालाचे अंदाज काय असतील याचा आढावा देणारे एक्झिट पोल संध्याकाळी 6.30 नंतर हाती येण्यास सुरूवात होणार आहे. दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी 272 हा बहुमताचा आकडा गाठायचा आहे. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता आहे. एनडीए विरूद्ध इंडिया आघाडी असा सामना देशभर बघायला मिळाला आहे.
यंदा देशात सात आणि महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. यंदा महाराष्ट्रामधून नितीन गडकरी, सुप्रिया सुळे,नारायण राणे यासारख्या दिग्गज राजकारण्यांसोबतच सुनेत्रा पवार यांच्या सारख्या पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार्या उमेदवारांच्या भवितव्याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात 60.78 टक्के मतदान झाले आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष आहे. मनसे कडून या निवडणूकीत महायुतीला पाठिंबा देण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाने 400 पार चा नारा दिला आहे. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार का? तिसर्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान होणार का? या सार्या प्रश्नांची उत्तरं आता मिळणार आहे.
2019 च्या निवडणुकीत, भाजपने 303 जागांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) 352 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 52 जागा मिळाल्या आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) ने एकूण 91 जागा मिळवल्या होत्या. मात्र मागील काही वर्षात पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं आहे त्याचा परिणाम या निकालात होणार का? हे पाहणं इंटरेस्टिंग आहे.