संजय निरुपम आणि नरेंद्र मोदी (फोटो सौजन्य-Twitter/PTI)

काँग्रेस (Congress) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मोदी हे औरंगजेब (Aurangzeb) असून मुगल शासनाचे आधुनिक अवतार असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. वाराणसी येथून जनतेने ज्यांना निवडणून दिले आहे ते औरंगजेबाचा अवतार आहे. कारण बनारस येथील काही मंदिरे कॉरिडोरच्या नावाखाली मोदींनी दिलेल्या इशाऱ्यावरुन पाडण्यात आली आहेत. त्याचसोबत विश्वनाथ मंदिरात भाविकांकडून 550 रुपये दर्शनासाठी घेतले जातात ते पण मोदी यांच्या आदेशामुळे घेत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी हे दुर्योधन असल्याचे म्हटले ते योग्य आहे. तर मी त्यांना औरंगजेबाचा अवतार असल्याचे म्हणेन असे निरुपम यांनी म्हटले आहे. तसेच दुर्योधन आणि रावणासारखा अहंकार हा मोदी यांच्यामध्ये दिसून येत असल्याचे यापूर्वी सुद्धा प्रियांका गांधी यांनी कवितांमधून दाखवून दिले होते.(Lok sabha Election 2019: निवडणूकीच्या निकालावर 12,000 करोड रुपयांचा सट्टा, जाणून घ्या निवडणूकीच्या रणधुमाळीतील सट्टा बाजाराचे स्वरुप)

त्याचसोबत महाभारतातील दुर्योधनाच्या पात्राप्रमाणे मोदी यांची भुमिका असून त्यांच्यामध्ये अहंकार असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले. तर मोदी यांनी माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी हे भ्रष्ट्राचारात प्रथम असल्याचे म्हटल्यामुळे प्रियांका गांधी यांनी मंगळवारी मोदी यांना प्रतिउत्तर दिले आहे.