Lok Sabha Elections 2019: नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी कमी, रिकाम्या खुर्च्याच अधिक; विरोधकांनी उडवली खिल्ली
Empty Chairs At Modi Meerut Rally | (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मेरठ (Meerut) येथे जाहीर सभा घेत लोकसभा निवडणूक 2019 चे रणशिंग फुंकले खरे. परंतु, या सभेत नेहमीप्रमाणे त्यांच्या लोकप्रियतेचा प्रभाव पाहायला मिळाला नाही. पंतप्रधान मोदींची सभा म्हटले की, ओसंडून गर्दीने ओसंडून जाणारी मैदानं आणि भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष हे समिकरण पाहायला मिळते. मेरठ येथील सभा मात्र त्याला काहीशी अपवाद ठरावी अशी राहिली. नरेंद्र मोदी यांच्या मेरठ येथील सभेला गर्दी राहिली. मात्र, ती केवळ सुरुवातीच्या काही रांगांमध्येच. पाठीमागच्या अनेक रांगा रिकाम्याच दिसत होत्या. त्यामुळे मोदींच्या सभेला आता गर्दी कमी, रिकाम्या खुर्च्या ( Empty Chairs At Modi Meerut Rally) अधिक असे चित्र दिसू लागल्याची चर्चा रंगली.

पंतप्रधान मोदी यांच्या सभास्थळी ओस पडलेल्या खुर्च्यांच्या रांगांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून विरोधकांनी निशाणा साधला नसता तरच नवल. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्त संजय झा यांनी Maya Mirchandani, @maya206 या ट्विटरवरुन पोस्ट करण्यात आलेले फोटो रिट्विट केले आहेत. हे फोटो रिट्विट करताना झा यांनी 'आऊच' अशी खोच टिप्पणीही केली आहे. (हेही वाचा, नरेंद्र मोदी यांच्या 'मैं भी चौकीदार' प्रचार मोहीमेकडे 3.20 लाख बँक कर्मचाऱ्यांनी फिरवली पाठ)

Maya Mirchandani, @maya206 ट्विट

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे भाजप आणि मित्रपक्षांच्या प्रचारार्थ पुढील 44 दिवसांमध्ये तब्बल 100 पेक्षाही अधिक सभा घेणार असल्याचे समजते. मोदींच्या सभेला समर्थकांनी केवळ पहिल्या रांगेत गर्दी केली. मात्र, मागच्या रांगेत सर्व खुर्च्या रिकाम्याच होत्या असे ट्विट माया मिरचंदानी यांनी केले आहे.‘पहिल्या रांगेत समर्थकांची गर्दी तर मागे रिकाम्या खुर्चा, पहिल्या सभेसाठी मोदी मेरठमध्ये दाखल झाले तेव्हाचे चित्र’, असे मिरचंदानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.