PM Modi | (Photo courtesy: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (26 एप्रिल) वाराणसी (Varanasi) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी जेडीयू अध्यक्ष नीतिश कुमार (Nitish Kumar), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  (Udhav Thackeray) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. तर अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नरेंद्र मोदी यांची संपत्ती जवळजवळ अडीच कोटी रुपयांची आहे.

तर गांधीनगर येथील एका घरासाठी 25 टक्के मालकी हक्क असून हातात फक्त 38 हजार रुपयांची रक्कम असल्याचे समोर आले आहे. त्याचसोबत चल संपत्ती एकूण 1.41 कोटी रुपये असून अचल संपत्ती 1.10 कोटी रुपयांची आहे. तसेच एकाही रुपयाचे कर्ज मोदी यांच्या डोक्यावर नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सरकारकडून मिळणारे व्याज आणि पगार हे मोदी यांच्या उत्पन्नाचे साधन असल्याचे मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.(Loksabha Elections 2019: काळभैरवाच्या पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल)

मोदी यांच्या नावाने कोणतीही जमिन किंवा व्यवसाय नाही आहे. तर गांधीनगरात मालकी हक्क असलेल्या घराचा बाजारभाव 1.10 कोटी एवढा आहे.