Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात AFSPA हटवण्याचा उल्लेख केला असल्याचे म्हटले आहे. तसेच सत्तेत आल्यास जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) येथून AFSPA हटवणार असल्याचे म्हटले आहे. न्यूज18 नेटवर्कचे चीफ एडीटर राहुल जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे.
मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत AFSPA हटवणे म्हणजे जवानांना फासावर देण्यासारखे आहे. त्यामुळे सैन्याचा विश्वास कायम ठेवण्यासाठी हा नियम गरजेचे असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसने सादर केलेल्या जाहीरनाम्यात या नियमाचा उल्लेख असून देशद्रोहा संबंधित कायद्यावर सुद्धा विचार करणार असल्याचे म्हटले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा चर्चा करुन जाहीर, तर भाजपचा जाहिरनाम्याचा विचार बंद खोलीत - राहुल गांधी)
तर काँग्रेस पक्षाचे विचार हे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांसारखे असल्याची टीका भाजपने यापूर्वी केली होती. त्यात आता AFSPA हटविणे म्हणजे सैन्याकडून त्यांची शस्रे घटवण्यासारखे असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.