Lok Sabha Elections 2019: बसप पक्षाच्या कार्यकर्त्याने चुकून भाजपला मत दिल्याने बोट कापले
EVM (FILE PHOTO)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला पार पडले. त्यावेळी उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने बसप पक्षाला मत देण्याऐवजी भाजप (BJP) पक्षाला मतदान केले.

बुलंदशहर (BulandShahar) येथील शिकारपूर मधील एका बसप (BSP) पक्षाच्या कार्यकर्त्याने मतदान करण्यास गेला होता. त्यावेळी त्याने चुकून हत्तीच्या बटण दाबण्याऐवजी कमळावरील बटण दाबले. मात्र जेव्हा त्याला कळले की भाजप पक्षाला आपण मतदान केले आहे तेव्हा त्याने चक्क स्वत:चे बोट कापून घेतले असल्याचा प्रकार घडला आहे.(बुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी)

बसपचा कार्यकर्त्याला महागठबंधन असलेल्या उमेदवाराला मत द्यायचे होते. परंतु चुकून भाजपला मत देऊन पश्चाताप व्यक्त करत त्याने असे कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार येथील टक्केवारी वाढली असल्याचे वरिष्ठ निवडणुक आयुक्त उमेश सिंग यांनी स्पष्ट केले.