BJP (Photo Credits- Facebook)

Lok Sabha Elections 2019: भाजप (BJP) पक्षाने गुरुवारी (21 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 20 राज्यातून 184 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. गेल्या लोकसभेच्या वेळी यंदासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाराणसी (Varanasi) येथून निवडणुक लढवणार आहेत. त्याचसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amiy Shah) पहिल्यांदाच लोकसभा निवडणुक लढवणार आहेत.

येत्या 11 एप्रिल पासून निवडणुकीसाठी मतदान सुरु होणार आहे. एकूण 7 टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार असून 19 मे रोजी पर्यंत पार पडणार आहे. तर 23 मे रोजी या मतदानाचा निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी काल भाजप पक्षाने जाहीर केलेली उमेदावारांची पहिली यादी त्यामधील या 5 महत्वाच्या गोष्टी जरुर जाणून घ्या.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: 'भाजप'ची पहिली उमेदवार यादी जाहीर; महाराष्ट्रात या लोकांना मिळाली उमेदवारी)

गांधीनगर येथून अमित शहा यांना तिकिट

भाजप अध्यक्ष अमित शहा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुक लढवणार आहेत. गुजरात मधील गांधीनर येथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत अमित शहा पक्षातील कामकाज संबंधित कामांकडे लक्ष देत होते. मात्र आता गांधीनगर निर्वाचन क्षेत्रामधून निवडणुकीच्या माध्यमातून आपले भाग्य आजमवणार आहे. तर गांधीनगर हे वरिष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे क्षेत्र आहे.

अमेठी येथून पुन्हा एकदा स्मृति ईराणी आणि राहुल गांधी आमने-सामने

भाजप नेता आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समोर निवडणुकीसाठी दिसून येणार आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत राहुल गांधी यांना स्मृति ईराणी अमेठी मधून टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसी येथून निवडणुर लढवणार

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून पहिल्यांदा लोकसभा निवडणुक लढवली होती. तर यंदाची सुद्धा निवडणुक लढवणार आहेत. तर 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी आम आदमी पार्टी नेता अरविंद केजरीवाल यांना 3,70,000 मतांनी पराभव केला होता.

(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: भाजप VVIP उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ; नरेंद्र मोदी, अमित शाह रिंगणात)

वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी आणि बीसी खंडूरी रिंगणातून बाहेर

2014 मधील लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पक्षाने असे ठरविले आहे की, पक्षात 75 वर्षावरील अधिक वय असणाऱ्या नेत्याला निवडणुक लढवता येणार नाही. या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी आणि बीसी खंडुरी निवडणुक लढवणार नसल्याचे सांगितले आहे.

यादीमध्ये 20 राज्यातील उमेदावर जाहीर

भाजप कडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत 184 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून (16), असाम (8), अरुणाचल प्रदेश (2), छत्तीसगढ (5), जम्मू-काश्मिर (5), कर्नाटक (20), केरळ (13), ओडिशा (10), राजस्थान (16), तेलंगणा (10), उत्तराखंड (5), पश्चिम बंगाल (28), उत्तर प्रदेश (28), आंध्र प्रदेश (2) मणिपूर (2), मिजोराम, सिक्किम, त्रिपूरा मधून प्रत्येकी 1 जागा. तसेच लक्षद्वीप, अंदमान-निकोबार द्वीप आणि दादरा-नगर हवेली मधून 1-1 उमेदवारांना तिकिट देण्यात आले आहे.

तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांना अनुक्रमे लखनऊ आणि नागपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच ईशान्य-मुंबई मधून पुनम महाजन निवडणुक लढवणार आहेत.