केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काँग्रेस (Congress) नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा उल्लेख 'बालबुद्धी' (Baalbuddy) असा केला आहे. गांधी यांनी मिस इंडिया (Miss India) स्पर्धेत दलित (Dalit), आदिवासी (Adivasi) आणि ओबीसी (OBC) प्रतिनिधित्व नसल्याबद्दल नुकतीच टीप्पणी केली होती. या टीप्पणीनंतर सत्ताधारी वर्गाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. तसेच, राहुल गांधी यांची खिल्ली उडवत हे विधान त्यांच्या बाल मानसिकतेतून आल्याची संभावना सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली.
जातनिहाय जनगणनेची पुन्हा मागणी
राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील संविधान सन्मान संमेलनादरम्यान जातनिहाय जनगणनेची मागणी केली. तसेच, सौंदर्य स्पर्धा, प्रसारमाध्यमे आणि क्रीडा यासह विविध क्षेत्रांमध्ये उपेक्षित समुदायांचे अधिक प्रतिनिधित्व असण्याची आवश्यकता प्रतिपादन करतानाच, अशा स्पर्धांमधून 90 टक्के" लोकांना वगळण्यात येते. ज्यामध्ये दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांचा समावेश असतो. त्यामुळे भारताच्या प्रगतीला बाधा येत असल्याचा दावाही गांधींनी केला. (हेही वाचा, Rahul Gandhi reacts to Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: 'समाज म्हणून आपण कुठे जातोय? याचा विचार करण्याची वेळ; देशभर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर राहुल गांधी यांची पोस्ट)
मी मिस इंडिया यादीत एकही दलित, आदिवासी नाही
राहुल गांधी यांनी म्हटले की, "मी मिस इंडियाची यादी तपासली आहे, ज्यात एकही दलित, आदिवासी, किंवा ओबीसी महिला नाही. क्रिकेट किंवा बॉलीवूडबद्दलही आपणास अशाच प्रकारची माहिती पाहायला मिळेल. ज्यामध्ये कोणीही मोची किंवा प्लंबर पाहायला मिळणार नाही. मीडियातील टॉप अँकरसुद्धा या 90 टक्के महिलांपैकी नाहीत,” असे राहुल गांधी यांनी गांधींनी प्रयागराजमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आणि अरुणाचल प्रदेशचे खासदार किरेन रिजिजू यांनी गांधींनी प्रथम वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. रिजिजू यांनी निदर्शनास आणून दिले की भारताचे विद्यमान राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू या आदिवासी आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी श्रेणीतील आहेत आणि मंत्रिमंडळात अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) समुदायातील विक्रमी मंत्र्यांचा समावेश आहे. आता त्यांना मिस इंडिया स्पर्धा, चित्रपट, खेळात आरक्षण हवे आहे! हा केवळ 'बालबुद्धीचा' मुद्दा आहे. अशा प्रकारच्या मागणीवर जल्लोष करणारे लोकही त्याला तितकेच जबाबदार आहेत!, असे रिजिजू यांनी म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ते पुढे म्हणाले, "मनोरंजनासाठी बालिश बुद्धी चांगली असू शकते परंतु तुमच्या फुटीरतावादी डावपेचांमध्ये मागासलेल्या समुदायांची चेष्टा करू नका."
रिजिजू यांनी गांधींना आठवण करून दिली की, सरकार मिस इंडिया विजेते, ऑलिम्पिक ऍथलीट किंवा चित्रपट कलाकार निवडत नाहीत आणि त्यांची टिप्पणी दिशाभूल होती यावर जोर दिला. सरकार मिस इंडियाची निवड करत नाही, सरकार ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची निवड करत नाही आणि सरकार चित्रपटांसाठी कलाकारांची निवड करत नाही.