बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने वातावरण तापलेले आहे. अशात राहुल गांधींंनीदेखील संताप व्यक्त केला आहे. देशात पश्चिम बंगाल, यूपी, बिहार नंतर महाराष्ट्रातही महिलांवर, चिमुकलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यावरून सार्याच स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना राहुल गांधी यांनी देखील X वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे पण पोलिस प्रशासनाच्या मर्जीवर तो अवलंबून राहू शकत नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. FIR दाखल न होणं ही केवळ पीडीतेला खच्चीकरण करणारी नव्हे तर गुन्हेगारांना शक्ती देणारी बाब आहे.
राहुल गांधी यांची महिलांंवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर पोस्ट
पश्चिम बंगाल, यूपी, बिहार के बाद महाराष्ट्र में भी बेटियों के खिलाफ शर्मनाक अपराध सोचने पर मजबूर करते हैं कि हम एक समाज के तौर पर कहां जा रहे हैं?
बदलापुर में दो मासूमों के साथ हुए अपराध के बाद उनको इंसाफ दिलाने के लिए पहला कदम तब तक नहीं उठाया गया जब तक जनता ‘न्याय की गुहार’…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)