माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) यांना सध्या तिहार तुरूंगात पाठविले जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सीबीआय कोठडीत 1 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यासह अंतरिम जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणारअसल्याचे कोर्टाने म्हणले. यापूर्वी वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की, माजी अर्थमंत्री 76 वर्षांचे आहेत, त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये. त्यांना त्यांच्या घरात नजरबंद करणे चांगले होईल. त्यांना अटक करण्यापासून सूटका मिळावी आणि जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा द्यावी, असे देखील सिब्बल यांनी याचिकेत म्हटले होते. (पी चिदंबरम यांना अटक झाली ते INX मीडिया प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या घटनाक्रम)
दुसरीकडे, सीबीआयने म्हटले होते की, ट्रायल कोर्टाने यावर निर्णय घ्यावा आणि पी. चिदंबरम यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळू नये. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की लालू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने थेट जामीन मंजूर केला. संरक्षण न दिल्यास ही याचिका कुचकामी ठरेल. यावर सीबीआयने सांगितले की ते होऊ शकत नाही, ते कायद्यात नाही, हे ट्रायल कोर्टाचे कार्यक्षेत्र आहे. कोर्टाने म्हटले आहे की हाऊस अरेस्ट करू शकत नाही तर सिब्बल म्हणाले की आम्हाला अंतरिम जामीन द्यावा. मग कोर्टाने सांगितले की तुम्ही ट्रायल कोर्टात बोलले पाहिजे. सिब्बल यांनी पुन्हा सांगितले की तुम्ही कोणतीही अट तयार करा, पण संरक्षण द्या, ही 2007 ची बाब आहे.
पी चिदंबरम यांच्यावर अर्थमंत्री असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात आयएनएक्स मीडियामध्ये परकीय गुंतवणूक सुलभ केल्याचा आरोप आहे आणि त्या बदल्यात त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या कंपनीला फायदा झाला होता. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्याच्या आणि रिमांडच्या न्यायालयीन निर्णयाच्या विरोधात माजी अर्थमंत्र्यांनी याचिका दाखल केली होती.